मंदिर वेळ - सकाळी ५ ते रात्री १० vithaldehu123@gmail.com

इतिहास

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज

 

  • जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील संत होते, त्यांनी लिहिलेल्या गाथे मधील अभंग आजच्या काळात मनुष्याच्या जीवना मध्ये व राष्ट्र हिता साठी उपयोगी ठरतात.
  • त्यांचा जन्म १६०८ मद्ये श्री क्षेत्र देहू मध्ये झाला ,तुकाराम महाराजांच्या घराण्या मध्ये पूर्वापार वारीची परंपरा चालू होती.
  • तुकाराम महाराज हे विश्वंभर बाबा पासून आठव्या पिढीचे वंशज होते.
  • विश्वंभर बाबा नंतर त्यांचे दोन्ही मुलं सैन्य मध्ये भरती झाले

 मूळ पुरुष एवं विश्वंभर |
विठ्ठलाचा भक्त थोर |

त्याचे भक्तीने पंढरी सोडून |
देहुस आले हरी |

             विश्वंभर बाबा
                   ↓              ↓

                       हरी           मुकुंद 
    ↓ 
विठ्ठल
    ↓ 
पदाजी
    ↓ 
शंकर
     ↓ 
कान्होबा
      ↓ 
बोल्होबा
    ↓

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज

मध्ये त्यांचा जन्म : श्री क्षेत्र देहू

  • अशी आठ पिढ्या पासून वारीची  परंपरा तुकाराम महाराजांचे घराण्यात होती.तुकोबा रायांचे वडील बोल्होबा मोरे यांनी ४० वर्षे  पंढरीची वारी केली,तदनंतर तुकोबांनी ही परंपरा चालू ठेवली.त्यांचे दिंडी मध्ये सुमारे १४०० टाळकरी होते,ते सर्व दर एकादशीला देहू मध्ये जमत ,तुकाराम महाराज दर वद्य एकादशीला दिंडी सहित आळंदीला जात व कीर्तन करत आजही ती अखंड  परंपरा चालू आहे.
  • तसेच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरांचे मंदिर तुकाराम महाराजांनी बांधले अशी नोंद देखील आहे.(संदर्भ Bombay presidency Volume – Part 3, Poona gazettier 1885,Page 102-104)
  • श्री तुकोबाराय वैकुंठाला जाईपर्यंत हा वारीचा सोहळा प्रती वर्षी पार पाडत असत.त्यांचे वैकुंठ गमन झाले तेव्हा त्यांची मुले लहान होती.तेव्हा वारीची परंपरा त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली,तदनंतर महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी देहू ते पंढरपूर पालखी सोहळा सुरू केला तो आजतागायत चालू आहे.या पूर्वी कोनाही संतांची पालखी जन्मगावाहून आषाढी वारी ला पंढरीला नेली जात नव्हती

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके :

  • संत तुकाराम गाथा म्हणजे भाविकांचे आध्यात्मिक विद्यापीठे आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली साडे तीनशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे.

  • जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथे मधील अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. हे अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामधील शब्द हे कानामध्ये गुंज घालणारे आहेत..  

  • जगद्गुरू श्री संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला. नंतर ते विरोधक नमले.

  • संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे.

  • संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले.

     

    तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.

  • गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर (भाषांतरकार – कर्णे गजेंद्र भारती महाराज)

  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)

  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)

  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)